उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला

 Dalmia Estate
उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला
उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला
उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या भेटीला
See all
Dalmia Estate, Mumbai  -  

मुलुंड - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलीये. रविवारी संध्याकाळी मुलुंड आणि भांडुपमधील काही महत्त्वाच्या शिवसेना शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली. या भेटीमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. तसंच विभागातल्या राजकीय घडामोडीही उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतल्या. या भेटीसाठी मुलुंडमधील शाखा सज्ज होत्या. या वेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही उपस्थित होते. 'या भेटीमुळे आम्हाला काम करण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळाली,' अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Loading Comments