Advertisement

मुख्यमंत्री गुंडांचे मंत्री झालेत का? - उद्धव ठाकरे


मुख्यमंत्री गुंडांचे मंत्री झालेत का? - उद्धव ठाकरे
SHARES

दादर - युती तुटताच शिवसेना आणि भाजपामध्ये चिखलफेक सुरू झाली आहे. भाजप मेळाव्यातील भाषणा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी खोचक टोमणा दिला आहेत. "मी फार बोलणार नाही, नाही तर घसा बसेल," असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर पत्रकारांशी संवाद साधला.

"लाल किल्ल्यावर भाषण केल्याने पंतप्रधान होत नाही. तसेच स्वतःला कृष्ण म्हणवून घेतल्याने कोणी कृष्ण बनत नाही," असा चिमटा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. "मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. गुंडांना पक्षात प्रवेश देऊन मुख्यमंत्री हे गुंडांचे मंत्री झालेत की काय?" असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा