Advertisement

पक्षप्रमुखांच्या भेटीनं शिवसैनिक भारावले


पक्षप्रमुखांच्या भेटीनं शिवसैनिक भारावले
SHARES

कुलाबा - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलाबा आणि फोर्ट येथील शिवसेना शाखांना सोमवारी संध्याकाळी भेट दिली. खुद्द पक्षप्रमुख शाखेत आल्यामुळे सर्व शिवसैनिक भारावून गेले. या वेळी उद्धव यांनी शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विभागात काम कसं सुरू आहे याचा आढावा घेतला. तसंच शिवसैनिकांची आपुलकीने विचारपूसही केली. प्रथम उद्धव यांनी कुलाब्यातील शाखा क्रमांक 25 ला भेट देली. रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कुलाबा परिसराला भेडसावणारा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल, असं आश्वासन त्यांनी स्थानिकांना दिलं. खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, नगरसेवक गणेश सानप, शाखाप्रमुख विक्रम धोत्रे, विधानसभा समन्वयक कृष्णा पोवळे, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या वेळी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement