Advertisement

अतिवृष्टीमुळे राज्याचं प्रचंड नुकसान; केंद्रानं ७००० कोटी मदत द्यावी - वडेट्टीवार

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीमुळं राज्याचे प्रचंड मोठं नुकसान झालं असून, केंद्र सरकारनं महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे.

अतिवृष्टीमुळे राज्याचं प्रचंड नुकसान; केंद्रानं ७००० कोटी मदत द्यावी - वडेट्टीवार
SHARES

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अतिवृष्टीमुळं राज्याचे प्रचंड मोठं नुकसान झालं असून, केंद्र सरकारनं महाराष्ट्राला ७ हजार कोटींची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. 

यंदाच्या मॉन्सून कालावधीत राज्याला पावसानं झोपडून काढल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक आलेल्या चक्रीवादळामुळं हजारो नागरिकांचे कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. शिवाय, शेतकरी बांधवांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळं शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक भागात शेती पाण्याखाली गेलीय. तर सोयाबीनसह ऊस पिकांचे भरुन न येणारे नुकसान झाल आहे. अशावेळी सरसकट पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी मराठवाड्यात नुकसानाची पाहणी केली आणि यावेळी बोलताना केंद्राने महाराष्ट्राला मदत द्यायला हवी, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला तातडीनं १ हजार कोटी रुपयांची मदत दिली. त्या पद्धतीने महाराष्ट्रातील नुकसान पाहता राज्याला किमान ७ हजार कोटींची मदत केंद्र सरकारने करावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना आम्ही भेटणार आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय चर्चेला येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा