'...तर शिवसेनेने सरकारमधून सीमोल्लंघन केले असतं'

 Pali Hill
'...तर शिवसेनेने सरकारमधून सीमोल्लंघन केले असतं'

मुंबई - 'शिवसेनेचा स्वाभिमान संपुष्टात आला आहे. स्वाभिमान शिल्लक असता तर शिवसेनेने सरकारमधून सीमोल्लंघन करून खऱ्या अर्थाने दसरा साजरा केला असता. शिवसेनेची शस्त्रं गंजली आहेत. त्यांची धार गेली आहे', अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी केली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. 'पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचार करू नये, अशी मागणी करून उद्धव ठाकरेंनी मोदी किंवा फडणवीसांना तोंड देण्याची शिवसेनेची क्षमता नाही, अशी जाहीर कबुलीच दिली आहे,' असे विखे-पाटील म्हणाले.

Loading Comments