हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेशबंदीच


SHARE

हाजीअली- हाजीअली दर्ग्यातील महिला प्रवेशावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने वाढवली आहे. त्यामुळे हाजीअली दर्ग्यातील महिला प्रवेश लांबणीवर पडला आहे. हाजीअली ट्रस्टने आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टाकडे दोन आठवड्यांची वेळ मागितली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने हाजीअली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले आहे. तसंच दर्ग्यामध्ये पुरुषांना प्रवेश, महिलांना प्रवेश नाही ही बाब अडचण निर्माण करणारी असल्याचे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हाजीअली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन मुंबई हायकोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. सध्या हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या