Advertisement

'राज ठाकरेच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याच स्टाईलनं देणार' - विनोद तावडे


'राज ठाकरेच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याच स्टाईलनं देणार' - विनोद तावडे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सभांमधून सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत. परंतु, आता राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलनं उत्तर देण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. राज ठाकरे सभांमध्ये मांडत असलेल्या मुद्द्यांची वास्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडीओ दाखविणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजप प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली आहे.


टुरिंग टॉकीजमुळं जनतेची करमणूक

राज ठाकरे आपल्या सभांमध्ये ज्या स्टाईलनं आरोप करत आहेत, त्याच स्टाईलनं भाजप २७ तारखेच्या सभेत उत्तर देणार आहे. आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, २७ एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्या. कारण या टुरिंग टॉकीजमुळं जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसंही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळं राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नाही, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.


'तो' फोटो अधिकृत जाहिरातीमधला नाही

मुंबईतील काळाचौकी येथे मंगळवारी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी दाखवलेला चिले कुटुंबाचा फोटो भाजपच्या किंवा शासनाच्या अधिकृत जाहिरातीमधला नाही. कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावर तो प्रसिद्ध झालेला नाही. हा फोटो एखाद्या मोदीप्रेमीनं सोशल मीडियावर पोस्ट केला असू शकतो. मात्र, अशा पद्धतीनं फोटो वापरणं चुकीचं असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. तसंच, राज ठाकरेंच्या नावानंही अनेक पेजेस आहेत, ते सगळेच काही अधिकृत नाहीत. त्यांच्या अधिकृत पेज वर असलेली माहितीच आम्ही खरी मानतो, असं विनोद तावडे यांनी म्हटलं. तसंच, चिले परिवारातील सदस्यांनी स्वत:हून सांगितलं की असा फोटो अपलोड झालाय हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं राज ठाकरेंनी स्वत:हून काहीतरी शोधून काढलं वगैरे असा आव आणू नये, असंही विनोद तावडेंनी म्हटलं.हेही वाचा -

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधासंबंधित विषय
Advertisement