Advertisement

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधा

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांन मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानाच्या दिवशी विविध सुविधा पुरवण्याच येणार आहेत. अशातच आता, महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगानं मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधा
SHARES

यंदा लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक मतदारांन मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानाच्या दिवशी विविध सुविधा पुरवण्याच येणार आहेत. अशातच आता, महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगानं मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड देण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम पहिल्यांदाच मुंबईच्या उपनगरातील ‘सखी’ मतदान केंद्रावर राबवला जाणार आहे.


महिला मतदारांसाठी सॅनेटरी पॅड

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी मतदान सोमवार २९ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांना सॅनेटरी पॅड देण्यात येणार आहे. दरम्यान, मतदानासाठी ‘सखी मतदान केंद्र’ उभारण्यात आले असून, या मतदान केंद्रावर अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्व मतदान प्रक्रिया महिलांद्वारे पार पाडली जाते अशा केंद्रावरच मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड दिले जाणार आहेत.


‘सखी मतदान केंद्र’

मुंबईच्या २६ विधानसभा मतदारसंघांत हा उपक्रम राबवला जाणार आहे. तसंच, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निकडणुकीदरम्यान राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे ३०० सखी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.हेही वाचा -

'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी'- विनोद तावडेRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा