Advertisement

'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी'- विनोद तावडे

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुन्हा एकदा राज यांची खिल्ली उडवली आहे. 'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी', असं म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला.

'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी मतदानानंतरही सुरू राहावी'- विनोद तावडे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभेत भाजपा सरकार आणि मोदींच्या विविध योजनांची पोलखोल करत आहेत. मुंबईतील काळाचौकी इथं झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपनं एका कुटुंबीयांचा फोटो वापरत 'मोदी है तो मुमकीन है' अशी खोटी जाहिरात केल्याची पोलखोल केली. यावर शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुन्हा एकदा राज यांची खिल्ली उडवली आहे. 'राज ठाकरेंची स्टँडअप कॉमेडी निवडणुकांनंतरही अशीच चालू राहावी', असं म्हणत त्यांनी राज यांना टोला लगावला. त्याचप्रमाणं, राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवलेल्या कुटुंबाच्या जाहिरातीसंदर्भात बोलताना, शासनाचा किंवा भाजपाचा त्याच्याशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. 


'मोदी पुन्हा पंतप्रधान नाहीत'

मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात मंगळवारी राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेमध्ये राज यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. 'उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचं आवाहन करणं, म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीनं जाहीरपणं कोणत्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केल्याचं मला तरी आठवत नाही', असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर विनोद तावडे यांनी उत्तर देत, 'राज ठाकरे हे म्हणणं म्हणजे पवारसाहेबांच बोट धरुन पुढे येणं आहे. या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे मुकेश अंबानी ठरवत नसून, देशातील सर्वसामान्य जनता ठरवत', असं त्यांनी म्हटलं.


'मोदीप्रेमानं पेज सुरू'

मुंबईतल्या सभेमध्ये राज यांनी बोलवलेल्या कुटुंबाबाबत बोलताना तावडेंनी याचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. 'कुणीतरी मोदीप्रेमानं हे पेज सुरू केलं असून, त्याचा सरकारशी आणि भाजपाशी संबंध नाही. तसंच, या फोटोवर हे लाभार्थी असं कुठंही लिहिलं नाही. कुणतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है.. असं लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणं चुकीचं आहे. तसंच, राज ठाकरेंची ही स्टँडअप कॉमेडी, टुरिंग टॉकीज राज्यातील मतदानानंतरही असंच सुरू राहू द्या, त्यामुळं २३ तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल', असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

रेल्वे करणार महिला प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ

व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के स्लीपची मोजणी करा, विरोधकांची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा