रेल्वे करणार महिला प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ


SHARE

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांविरोधातील गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं महिला प्रवाशांच्या सुरक्षितते साठी अधिकाधिक पावलं उचलली आहेत. २०१८ मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी १५८ तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, यांपैकी काही तक्रारींवर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, लोकलनं दररोज जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करत असून, यामध्ये ३० टक्के महिला प्रवासी आहेत. टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सतर्फे (टीआयएसएस) केलेल्या संशोधनानुसार, महिलांना कमी प्रकाशाच्या स्थानकांवर आणि पुलांवर महिलांच्या सुरक्षेचा धोका आढळला  आहे.


सुरक्षाव्यवस्थेत कमी

रेल्वे मार्गावरील स्थानकांवरील अस्वच्छता, शौचालयांची कमतरता, पूलांच्या जीन्यांची अस्वच्छता आणि स्वयंचलित जीने दिवसेंदिवस महिला प्रवाशांसाठी डोकोदुखी ठरत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबात या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास महामंडळनं (एमआरव्हीसी) सल्लागार आणि संबंधित अधिकाऱ्यांना कमी प्रकाशीत भाग सुधारण्याची योजना आखण्यास सांगितलं आहे.

या स्थानकांत राबणार योजना

पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार  या योजनेला राबविण्यात येणार आहे. मध्य रेल्वे स्थानकावरील भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा, आणि जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी तसंच, हार्बर रेल्वे मार्गावरील मानखपर्द स्थानकात ही योजना राबविण्यात येणार आहे.हेही वाचा -

प्राप्तीकर विभागाची मुंबई विद्यापीठाला ५० कोटींची नोटीस

'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या