Advertisement

'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल

'मोदी है तो मुमकिन है' म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या फेसबुक पेजवर भाजपाकडून एका कुटुंबीयांचा फोटो वापरत खोटी जाहिरात करण्यात आली असून, त्या कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार करण्यात आला आहे. याबाबत मंगळवारी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी या संपूर्ण कुटुंबीयांना व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली.

'मोदी है तो मुमकिन है' जाहिरातीची राज ठाकरेंकडून पोलखोल
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही दिवसांपासून भाजप सरकारविरोधात जोरदार प्रचार करत आहेत. तसंच, आपल्या सभेमध्ये भाजप सरकार आणि मोदींच्या विविध योजनांची पोलखोल करत आहेत. अशातच आता 'मोदी है तो मुमकिन है' म्हणत मोदी फॉर न्यू इंडियाच्या फेसबुक पेजवर भाजपाकडून एका कुटुंबीयांचा फोटो वापरत खोटी जाहिरात करण्यात आली होती. तसंच, या कुटुंबाचा फोटो वापरत आम्ही कशी गरिबी हटवली याचा प्रचार करण्यात आला. याबाबत मंगळवारी मुंबईत झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी या संपूर्ण कुटुंबीयांना व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली. त्याशिवाय, अशा किती कुटुंबीयांचा वापर केला असेल, किती खोटा प्रचार करणार तुम्ही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला आहे.


वाभाडे काढलेले व्हिडीओ

'भाजपावाले काँग्रेस-राष्ट्रवादीचे वाभाडे काढलेले व्हिडीओ बाहेर काढत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी ते चुकले म्हणून त्यांचे वाभाडे काढले, आता हे सत्तेत असून ते वाट लावत आहेत, म्हणून यांचे वाभाडे काढत आहे. माझ्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं भाजपाकडं नाहीत म्हणून अशा टीका भाजपाकडून करण्यात येत आहेत’, असं राज यांनी काळाचौकी येथे मंगळवारी झालेल्या सभेत मोदी व शाह यांच्याविरोधात बोलताना राज म्हटलं आहे.


'मुख्यमंत्री पण भांबावलेत'

या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी 'सध्याच्या भाजपचे मूळपुरुष नरेंद्र मोदी हे इतकं खोटं बोललेत की भाजपच्या लोकांनाच कळत नाहीये की, याला तोंड कसं द्यायचं. भाषणांमध्ये दोन-तीन दिवसांची गॅप घेतली, म्हणलं मुख्यमंत्र्यांना जरा झोप घेऊ देत. मुख्यमंत्री पण भांबावलेत, त्यांना काही कळत नाहीये की याला कशी उत्तर द्यायची', असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.


मोठा घोटाळा

नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे आपल्या विरोधकांना सीबीआयच्या, ईडीच्या जाळ्यात अडकवत आहेत. मात्र हे दोघे पुढे विरोधी पक्षात जातील, तेव्हा यांच्यावर कशा सीबीआय, ईडीचे छापे पडतील ते पहाच. नोटबंदीची ज्यावेळी चौकशी होईल. तेव्हा १९४७ नंतर भारताच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा घोटाळा असेल असेही राज ठाकेरे यांनी म्हटलं आहे.



हेही वाचा -

'परे'वरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १३ कोटींचा दंड वसुल

म्हाडाच्या एका घरामागे तब्बल २१६ अर्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा