तरुणांना लाजवेल असा आजोबांचा उत्साह

  मुंबई  -  

  विक्रोळी - वय वर्षे 103.. नाव दगडू भांबरे...यांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. या आजोबांच वय 103 असलं तरी ते मुंबई मॅरेथॉनची तयारी करत आहेत. मुळचे नाशिकच्या मालेगावमध्ये राहणाऱ्या या आजोबांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि सगळीकडे एकच हवा झाली. आजोबा थोडंथोडकं नाही तर 4 किलोमीटर  धावणार आहेत.

  या वयातही आजोबांचा हा उत्साह तरुण पिढीला लाजवेल असाच आहे. वय कितीही असो मनात जिद्द असेल तर काहीही करता येतं हे या आजोबांनी दाखवून दिलंय. मुंबई मॅरॅथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या दगडू भांबरे यांना ‘मुंबई लाइव्ह’च्या शुभेच्छा.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.