Advertisement

डिसेंबरमध्ये मुंबईत 10 किमी इंटेन्सिटी रनचे आयोजन


डिसेंबरमध्ये मुंबईत 10 किमी इंटेन्सिटी रनचे आयोजन
SHARES

भारतात पहिल्यांदाच अॅथिलिटीक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि अँटी इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे 10 किमी इंटेन्सिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत 10 शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 सप्टेंबरपासून पुण्यातून या स्पर्धेची सुरुवात होईल तर, 11 फेब्रुवारी गोवा या शहरात शेवट होणार आहे. गुरुवारी वांद्रे येथे झालेल्या परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी ऑलिम्पिक आणि अर्जुन अवॉर्ड रचिता मिस्त्री, माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझेस उपस्थित होते. 


इंदोर, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, मुंबई, दिल्ली आणि गोवा इत्यादी शहरात या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतातील कोणताही अॅथलिट या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. 10 किमी, 5 आणि 2 किमी अशा तीन प्रकारात ही रन होणार आहे. एकूण 50 लाखांचे बक्षीस या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहे.


यामधून स्वछ भारत तसेच ग्रीन इंडिया आणि हेल्थ इंडियाचा संदेश लोकांना देणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना आम्ही झाडे देणार आहोत. एकूण 2 लाख झाडे आम्ही देणार आहोत. यामधून गोळा झालेली रक्कम नवीन खेळाडूंना घडवण्यासाठी वापरणार आहोत.
- आनंद मेनेझेस, माजी ऑलिम्पिकपटू


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा