कबड्डी स्पर्धेत वेस्टर्न रेल्वेचा थरारक विजय


  • कबड्डी स्पर्धेत वेस्टर्न रेल्वेचा थरारक विजय
SHARE

लोअर परळ - लोअर परळमध्ये विजय क्रीडा मंडळ आयोजित आणि सार्थ प्रतिष्ठान पुरस्कृत राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा सुरू आहे. रविवारी मुंबई बंदर आणि वेस्टर्न रेल्वे यांच्यात उपउपांत्य फेरीचा सामना झाला. हा अटीतटीचा सामना 32-32 गुणांवर थांबला. मात्र कबड्डीच्या पाच-पाच चढायांच्या नियमानुसार हा सामना पुन्हा खेळवण्यात आला. या वेळी वेस्टर्न रेल्वे संघाने अत्यंत उत्कृष्ट खेळ करत मुंबई बंदर संघावर विजय मिळवला. वेस्टर्न रेल्वेच्या रवी कुमारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दुसऱ्या उपउपांत्य फेरीत सेंट्रल रेल्वे डिव्हिजनवर मुंबई पोलीस संघानं 32-10 अशी एकतर्फी मात केली. मुंबई पोलीस संघातील विपुल मोकळेनं उत्कृष्ट पकडी सादर करताना संघाला उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या