Advertisement

टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरुशिची धडक


टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आरुशिची धडक
SHARES

टेबल टेनिस स्पर्धेतील कॅडेट महिला एकेरी गटात आरुशी राऊतने प्रतिस्पर्धी कनक अर्जुनवालकरला ३-२ ने मात देत उप-उपांत्य फेरीत रोमहर्शक विजय मिळवला. उत्तर मुंबई क्रीडा महोस्तवने आयोजित केलेली ही स्पर्धा पोईसर जिमखाना येथे पार पडली. आरुशी विरुद्ध कनक दरम्यान झालेली ही लढत अत्यंत रोमांचक होती. या स्पर्धेच्या पहिल्या दोन सेटमध्ये कनकने आघाडी घेत आपला दबदबा राखला. पण आरुशीने आक्रमक खेळाला सुरुवात करत नंतरच्या तिन्ही सेट मध्ये 6-11,5-11, 11-5, 11-9,11-4 अशा गुण संख्येने आघाडी घेत विजय साकारला.

दरम्याम याच गटातील इतर सामना प्राची दोशी विरुद्ध संक्रिती बसकमध्ये यांच्यात झाला. यामध्ये प्राचीने 11-9,11-13, 8-11, 12-10, 11-8 अशा गुणसंख्येने संकितीला मात देत विजय साकारला.

मिडगेट महिला एकेरी गटातील उपांत्य फेरीत लशीट्स शेनॉय आणि सिया दास मधील लढत अटीतटीची ठरली. यामध्ये शेनॉयने तिन्ही सेटमध्ये दास हीला झोपवत विजय आपल्या खिशात घातला. शेनॉय हीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत आघाडी साकरली. तिच्या आक्रमक खेळापुढे तिन्ही सेटमध्ये सिया दास हीला पराभव पत्कारावा लागला. यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात सरक्ष पाईने 11-8, 8-11, 7-11, 11-7, 11-4 अशा फरकाने अरत्या सतरकरचा पराभव करत विजय मिळवला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा