एअर इंडियाची शानदार कामगीरी

 Marine Drive
एअर इंडियाची शानदार कामगीरी

मरिन लाइन्स - मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा सुपर साखळी सामना रविवारी मरिन लाइन्सच्या गोअन्स मैदानात रंगला. 19 वर्ष वयोगटातल्या या सामन्यात एअर इंडिया संघाने बॉम्बे जिमखाना संघाला 3-1 ने मात दिली. उन्हाचा पारा चढलेला असताना एअर इंडिया संघाने मात्र उत्तम कामगिरी केली.

पण एअर इंडिया संघ तेव्हा अडचणीत आला जेव्हा त्या संघातल्या यश वनवेरूला लाल कार्ड दाखवण्यात आले. बॉम्बे जिमखानाला मात्र याचा फायदा उचलता आला नाही. अशा परिस्थितीत एअर इंडियाने लढत सुरू ठेवत बॉम्बे जिमखाना संघाला 3-1 ने मात देत विजय मिळवला. तर एअर इंडियातल्या अदनान यलीगर आणि अद्वैत शिंदे या खेळाडूंनी संघाच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading Comments