Advertisement

हॅरिस शील्डमध्ये अल बरकत मजबूत स्थितीत


हॅरिस शील्डमध्ये अल बरकत मजबूत स्थितीत
SHARES

नील पाताडे याने पाच विकेट्स मिळविण्याची करामत केली असली तरी अल बरकत इंग्रजी माध्यम शाळेने १२१ व्या हॅरिस शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर मजबूत पकड मिळवली अाहे. स्वामी विवेकानंद शाळेविरुद्ध सुरू असलेल्या तीन दिवसांच्या या अंतिम फेरीत अंकित यादव (७२), सौमिल मालंडकर (९२), अथर्व निगरे (३२) अाणि हिमांशू शाह (६३) यांनी सुरेख फलंदाजी करत अल बरकतला दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारून दिली. अल बरकत शाळेने १२८.५ षटकांत ३७४ धावा उभारल्या.


स्वामी विवेकानंद शाळेची घसरण

अल बरकतच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, स्वामी विवेकानंद शाळेची घसरगुंडी उडाली अाहे. रिशी शाह (६०) अाणि निशांत कदम (३०) यांनी चांगली फलंदाजी केली असली तरी सौद मन्सूरी अाणि नौफिल रोझानी यांच्या भेदक माऱ्यासमोर स्वामी विवेकानंदचा डाव घसरला. दुसऱ्या दिवसअखेर ५२ षटकांत स्वामी विवेकानंदची ६ बाद १४८ अशी बिकट अवस्था झाली अाहे. सौद मन्सूरीने तीन तर नौफिलने दोन विकेट्स मिळवल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा