Advertisement

स्क्वॅश टुर्नामेंटमध्ये अशिताला विजेतेपद


स्क्वॅश टुर्नामेंटमध्ये अशिताला विजेतेपद
SHARES

नवव्या इंडियन ज्युनियर ओपन स्क्वॅश टुर्नामेंटमध्ये भारताच्या दुसऱ्या मानांकित अशिता भेंग्राने उत्तम खेळ करत अनुक्रमे मुलींच्या 19 वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात विजय मिळवला. ही स्पर्धा बॉम्बे जिमखानातर्फे आयोजित करण्यात आली होती.

मुलींच्या 19 वर्षे वयोगटातील अंतिम सामन्यात चेन्नईच्या अशिता भेंग्राने अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरीचा तीन्ही सेटमध्ये सरळ 11-1, 11-7, 11-5 अशा फरकाने पराभव करत विजय मिळवला.

मुलांच्या 19 वर्ष वयोगटातील अंतिम सामन्यात भाराताचा तिसरा आणि चौथा मानांकित असलेला विकास मेहरा याला पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या अरमान जिंदालने पाच गेममध्ये 12-10, 11-7, 11-13, 5-11, 11-7 अशा गुण संख्येने विकासला पिछाडीवर टाकत विजय मिळवला.

17 वर्ष वयोगटातील मुलींच्या गटात अमेरिकेची अव्वल मानांकित खेळाडू अमिता गोंदीची दुसरी मानांकित असलेल्या भारताच्या सन्या वाट्ससोबत लढत झाली. या दोघींमध्ये झालेल्या लढतीत 13-11, 11-9, 11-8 अशा फरकाने अमिताने सन्याला हरवले.



याच दरम्यान झालेल्या मुलांच्या 17 वर्षांखालील गटात भारताचा अव्वल मानांकित सक्षम चौधरी याने दुसरा मानांकित तुषार सहानीला 11-5, 11-8, 5-11, 11-7 अशा गुण संख्यने पराभूत करत अंतिम सामन्यातील विजयावर आपले नाव कोरले.

भेंग्रा आणि जिंदाल या दोन्ही विजेत्यांना अंडर-19 वर्ष वयोगटातील विजेतेपद म्हणून चषक आणि प्रत्येकी 31,680 रुपये देण्यात आले. तर अंडर-17 गटात गोंदी आणि चौधरी यांना 23,040 रुपये देण्यात आले.



हेही वाचा - 

मलेशियन मुलींना स्क्वॉश स्पर्धेत तिहेरी विजेतेपद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा