Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
60,07,431
Recovered:
57,62,661
Deaths:
1,19,859
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,810
789
Maharashtra
1,21,767
9,371

मलेशियन मुलींना स्क्वॉश स्पर्धेत तिहेरी विजेतेपद


मलेशियन मुलींना स्क्वॉश स्पर्धेत तिहेरी विजेतेपद
SHARES

मलेशियाच्या खेळाडूंनी बुधवारी झालेल्या ९ व्या इंडियन ज्युनियर स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये तिहेरी विजेतेपद पटकावले. अंडर-११, अंडर-१३ आणि अंडर-१५ वर्षांखालील मुलींच्या गटात अनुक्रमे अनरी गोह, सेहवीत्रा कुमार आणि एरा अजमान यांनी बाजी मारली. ही स्पर्धा चर्चगेट येथील बॉम्बे जिमखान्यात खेळविण्यात आली होती.

या स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात मलेशियाच्या एराने भारताच्या अव्वल मानांकित अनन्या डबकेला पराभूत केले. एराने १३-११, ११-३, ११-५ अशा गुण संख्येने अनन्याचा पराभव केला. बॉम्बे जिमखान्याच्या ब्लॅक ग्लास स्क्वॉश कोर्टवर ही स्पर्धा झाली.

अंडर-१३ गटात अव्वल मानांकित सेहवित्रा हिने भारताच्या दुसऱ्या मानांकित युवना गुप्तावर ११-५,११-३, ११-५ अशा फरकाने मात केली. या लढतीत सेहवित्राने शानदार खेळाचे प्रदर्शन घडवत सामन्यावर पकड मिळवली.

अंडर-११ गटात अव्वल मानांकित मलेशियाची अनरी हिने भारताच्या दिव्या यादव सोबत झालेल्या लढतीत १२-१०, ११-८, ९-११, ११-९ अशा फरकाने दिव्यावर मात केली. ही लढत अत्यंत अटीतटीची झाली.हे देखील वाचा -

फुटबॉल लीगमध्ये वांद्रे पॅकर्सची कार्मेलाईट्स एससीवर मातडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा