कबड्डी स्पर्धेत बालमोहन तिसऱ्या स्थानावर


  • कबड्डी स्पर्धेत बालमोहन तिसऱ्या स्थानावर
  • कबड्डी स्पर्धेत बालमोहन तिसऱ्या स्थानावर
SHARE

दादर - शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश सेवा समितीतर्फे कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबई शहरातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 14 आणि 15 डिसेंबर दरम्यान पार पडली. 15 डिसेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना आणि उपांत्य सामना खेळविण्यात आला. ही स्पर्धा 17 वयोगटातील मुलींसाठी होती तर या स्पर्धेत लक्ष्मी विद्यामंदीर ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकवला तसेच यावेळी सौरांगीणी इंदर, प्राची तेले या दोघींनी उत्कृष्ट आशी कामगिरी करुन आपला संघ मजबूत केला. गौरी दत्त मित्तल विद्यालय, सायन यांनी द्वितीय क्रमांक पटकवला. तर दादरच्या बालमोहन विद्यामंदिरनं तृतीय क्रमांक पटकवला. बालमोहनच्या दूर्वा सावंत आणि आकांक्षा घाटकरने सुंदर खेळी खेळत शाळेला तृतीय क्रमांक मिळवून दिला. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 5000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 3000 रुपये, तर तृतीय क्रमांकाला 2000 रुपये मानधन आणि चषक तसेच सहभागी खेळाडूंना मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरुप होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या