SHARE

मानखुर्द - अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या सहा बांग्लादेशी नागरिकांना रविवारी एसबीआय शाखेच्या अधिकाऱ्यांनी मानखुर्दमधून अटक केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना १५ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अब्दुल बशिर अब्दुल अजीज, सोफिया खातून, रजिया खातून, अब्दुल अजीज शेख, अमानुल्ला हाफिजउद्दीन शेख आणि मरियम खातून अशी या सहा जणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत चोरट्या मार्गाने अनेक बांग्लादेशी नागरिक मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई शहरात वास्तव्याला येत असल्याची माहिती एसीबीआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस अधिकाऱ्यांनी बांग्लादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या