Advertisement

बीसीसीआयला प्रत्येक कसोटीमागे 50 कोटीचं नुकसान?


बीसीसीआयला प्रत्येक कसोटीमागे 50 कोटीचं नुकसान?
SHARES

मुंबई - जस्टिस लोढा समितीनं घातलेल्या आर्थिक निर्बंधांनंतरही भारत आणि इंग्लंड मधील मालिका ठरल्याप्रमाणेच खेळवली जाईल, असे संकेत इंग्लंड क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी दिले आहेत. पण ईसीबीनं हा दौरा रद्द करण्याचं ठरवलं, तर बीसीसीआयला प्रत्येक कसोटीमागे 50 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. ही मालिका रद्द झाली, तर त्यासाठी बीसीसीआयच जबाबदार राहील असं जस्टिस लोढा समितीनं ठणकावून सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 21 ऑक्टोबरच्या आदेशानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करत नाहीत, तोवर या निर्बंधांत कोणतीही सूट देण्यास देण्यास लोढा समिती तयार नाही. या प्रतिज्ञापत्रातून ठाकूर आणि शिर्के यांनी लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी बीसीसीआयला आणखी नेमका किती वेळ हवा आहे, हे स्पष्ट करावं तसंच असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. त्यासाठी बीसीसीआयला पाच नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा