Advertisement

मुंबईत पालिका ऑलिम्पिक स्टेडियम उभारणार

येत्या काळात असे स्टेडियम पालिका पश्चिम उपनगरात उभारण्याच्या विचारात आहे.

मुंबईत पालिका ऑलिम्पिक स्टेडियम उभारणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाजवळ एक ऑलिम्पिक-मानक स्टेडियम उभारण्याच्या तयारीत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अंदाजे 36 कोटी रुपयांच्या बजेटसह, हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. 

2025 मध्ये याचे अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. इथे आठ लेनचा 400 मीटरचा रनिंग ट्रॅक असेल. याशिवाय, लांब उडी, उंच उडी आणि भालाफेक या सुविधांसह शॉटपुट, डिस्कस थ्रो आणि हॅमर थ्रोसाठी वगेळे क्षेत्रे उपलब्ध असतील. 

किशोर गांधी, उपमहापालिका आयुक्त (उद्यान), यांनी सांगितले की, BMC चे ध्येय लोकांसाठी प्रवेशयोग्य जागतिक दर्जाचे अॅथलेटिक स्टेडियम तयार करणे आहे.

ते पुढे म्हणाले, "आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्यासाठी बीएमसीकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत आणि आम्ही त्याच्या बांधकामासाठी विशेष एजन्सींसोबत करार करू." 

बांधकाम जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. या स्टेडियममध्ये 566 जमांची बसण्याची व्यलस्था होऊ शकते. एकदा स्टेडियम पूर्ण झाल्यानंतर, केवळ जिल्हा आणि राष्ट्रीय-स्तरीय स्पर्धांचे आयोजन करणार नाही तर सामान्य लोकांना देखील नाममात्र शुल्कात देखील प्रवेश देईल. 

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई शहरासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. BMC अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की, नागरिकांचा प्रतिसाद आणि मोकळी जागा असेल तर ते भविष्यात पश्चिम उपनगरात अशाच प्रकारचे मैदान विकसित करू शकतात. या उपक्रमामुळे, मुंबईच्या क्रीडापटूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. हेही वाचा

ठाणे : टीएमसीची अभय योजना जाहीर

BMC च्या वांद्रे स्कायवॉक प्रकल्पाच्या किंमतीत वाढ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा