Advertisement

बाॅम्बे रिपब्लिकन्सला जेतेपद


बाॅम्बे रिपब्लिकन्सला जेतेपद
SHARES

बाॅम्बे रिपब्लिकन्स संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन घडवत इंडियन नेव्हीचा ३-२ असा पराभव करत सेंट पीटर्स यूथ सेंटरच्या वार्षिक हाॅकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले अाणि राफाल डाॅनल्ड ट्राॅफी उंचावली. वांद्रे येथील सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूलच्या ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात बाॅम्बे रिपब्लिकन्सने अचूक समन्वय राखत खेळ केला. गौरव निंबोळकर, वेंकटेश देवकर अाणि विनय वाल्मिकी यांनी गोल करत बाॅम्बे रिपब्लिकन्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. इंडियन नेव्हीकडून दोन्ही गोल दयानंद सिंगने केले. विजेत्या संघाला ५० हजार तर उपविजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात अाले.


सेंट स्टॅनिस्लाॅसला मुलांच्या गटाचे जेतेपद

मुलांच्या अांतरशालेय स्पर्धेत वांद्रेच्या सेंट स्टॅनिस्लाॅस हायस्कूलने कट्टर प्रतिस्पर्धी माटुंग्याच्या डाॅन बाॅस्को हायस्कूलचा टायब्रेकरमध्ये ३-२ असा पाडाव करत बाजी मारली. गोलशून्य बरोबरीत संपलेला हा सामना टायब्रेकरमध्ये जिंकत सेंट स्टॅनिस्लाॅस शाळेने जेतेपद पटकावले.


मुलींमध्ये सेंट जोसेफ काॅन्व्हेंटची बाजी

मुलींच्या गटात, वांद्रेच्या सेंट जोसेफ काॅन्व्हेंट शाळेने वांद्रेच्याच ड्युरेलो काॅन्व्हेंट शाळेचा २-१ असा पराभव करून जेतेपद मिळवले. सेंट जोसेफकडून शेरील गौरिया अाणि अमांडा डिसूझा यांनी गोल केले तर ड्युरेलो काॅन्व्हेंटकडून एेश्वर्या दुबे हिने एकमेव गोल केला.


हेही वाचा -

मुंबई हाॅकीत अाता निवडणुकीचे वारे!

कुलाबा केंद्राला बिपिन अांतरकेंद्र फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा