Advertisement

मुंबई हाॅकीत अाता निवडणुकीचे वारे!


मुंबई हाॅकीत अाता निवडणुकीचे वारे!
SHARES

सध्या सत्तेवर असलेल्या द मुंबई हाॅकी असोसिएशन लिमिटेडने (टीएमएचएएल) सादर केलेला 'चेंज रिपोर्ट' धर्मादाय अायोगाने नाकारल्यानंतर अाता मुंबई हाॅकीत निवडणुकीचे वारे वाहू लागले अाहेत. खेळाच्या भल्याकरिता नव्याने निवडणूका घेण्याची मागणी मुंबई हाॅकी असोसिएशनचे (एमएचए) सचिव कमांडर केहार सिंग यांनी केली अाहे. त्याचबरोबर सर्व हाॅकीपटू, मुंबईतील क्लब्स यांनी एकत्र येण्याचे अावाहनही त्यांनी केले अाहे.


टीएमएचएएल ही कंपनी कायद्यानुसार येत असून मुंबई हाॅकी असोसिएशन ही सोसायटी रजिस्ट्रेशन अाणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याअंतर्गत येत अाहे. दोन्ही संघटना या एकच असून त्यांचे विलिनीकरण करायला हवे तसेच त्या रद्दबातल करून ट्रस्टमध्ये रूपांतर करायला हवे. तरीही टीएमएचएएल ही सत्तेवर अाहे, हे योग्य नाही, असं धर्मादाय अायोगानं म्हटलं अाहे.


धर्मादाय अायोगाने दिलेला निकाल म्हणजे मुंबईतील सर्व खेळाडू अाणि क्लबचा विजय अाहे. मी नव्याने निवडणूका घेण्याची मागणी केली असून अामच्या संघटनेने राष्ट्रीय क्रीडा धोरणाची अंमलबजावणी केली अाहे. वयाच्या निकषानुसार मी निवडणूक लढवू शकत नाही, मात्र खेळाच्या प्रसारासाठी पारदर्शकपणे निवडणूका घ्यायला हव्या. महिंद्रा स्टेडियम हे शाळा, महाविद्यालये, क्लब्स अाणि राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांसाठी द्यायला हवे.
- कमांडर केहार सिंग, मुंबई हाॅकी असोसिएशनचे सचिव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा