Advertisement

सीसीअाय बॅडमिंटनमध्ये विप्लव कुवळेला तिहेरी मुकुट


सीसीअाय बॅडमिंटनमध्ये विप्लव कुवळेला तिहेरी मुकुट
SHARES

विप्लव कुवळे याने सीसीअाय ग्रेटर मुंबई डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अापल्या नावाचा दबदबा निर्माण केला. सीसीअायच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत विप्लवने पुरुष एकेरी, मिश्र दुहेरी अाणि पुरुष दुहेरी या तीन गटांत विजेतेपदावर नाव कोरलं. तीन सेटपर्यंत रंगलेल्या पुरुष एकेरीच्या थरारक अंतिम लढतीत विप्लवनं अव्वल मानांकित नायजेस डिसा याच्यावर विजय प्राप्त केला.


विप्लवचा दबदबा

पुरुष एकेरीत, विप्लवनं नायजेल डिसावर २१-१४, ९-२१, २१-१८ अशी मात केली. त्यानंतर पुरुष दुहेरीत फिरोझ मुलानीच्या साथीने खेळणाऱ्या विप्लवने निहार केळकर अाणि सिद्धेश अारोसकर यांचे अाव्हान २१-१९, २२-२० असे मोडीत काढले. मिश्र दुहेरीत अक्षया वारंग अाणि विप्लव कुवळे या अग्रमानांकित जोडीने अंतिम फेरीत अनघा करंदीकर अाणि सिद्धेश राऊत यांच्यावर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवून जेतेपदाची हॅटट्रिक साजरी केली.


करीना मदनला मुलींच्या एकेरीचं जेतेपद

करीना मदन हिने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत समीअा शाह हिच्यावर मात करून महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित करीना सुरुवातीला काहीशी चाचपडत होती. मात्र अापला खेळ उंचावत तिनं समीअावर २१-१५, २१-६ असा विजय संपादन करत विजेतेपद संपादन केलं.


हेही वाचा -

अव्वल मानांकित टायरन परेराला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement