मुलांच्या १७ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित टायरन परेराला सीसीआय ग्रेटर मुंबई डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया (सीसीअाय) अाणि द ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीसीअायवर सुरू असलेल्या या स्पर्धेत टायरनला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. तरीही टायरनने कडवी झुंज दिली. अखेर दारियस पर्डिवाला याने त्याला २१-१७, १७-२१, २३-२१ असे पराभूत केले.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात दुसऱ्या मानांकित विक्रांत निनावेने अापली विजयी घोडदौड कायम राखत अंतिम फेरीत मजल मारली. विक्रांतने उपांत्य फेरीच्या सामन्यात अार्यवर्धन जाधवचे अाव्हान १८-२१, २१-१६, २१-१५ असे संपुष्टात अाणले. अाता अंतिम फेरीत त्याला दारियस पर्डिवाला याचा सामना करावा लागेल.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात, पूजा कचरे हिने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टिअा मिश्रा हिला २१-१८, २१-१७ असे हरवले. एेश्वर्या हळदणकर हिने शची जुकर हिला २१-१५, २१-१३ असे पराभूत केले.
हेही वाचा -