Advertisement

टायरन परेरा याची विजयी घोडदौड सुरूच


टायरन परेरा याची विजयी घोडदौड सुरूच
SHARES

अव्वल मानांकित टायरन परेरा याने पुन्हा एकदा झुंजार खेळीचे प्रदर्शन करत सीसीअाय-ग्रेटर मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली अाहे. क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया (सीसीअाय) अाणि द ग्रेटर मुंबई बॅडमिंटन असोसिएशन (जीबीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने सीसीअायच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत टायररने मुलांच्या १७ वर्षांखालील गटात शिवम मिरके याचे कडवे अाव्हान मोडीत काढत उपांत्य फेरीत मजल मारली.


तीन गेमपर्यंत रंगला सामना

तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात टायरनने १८-२१, २१-१०, २१-७ असा विजय मिळवला. पहिला गेम शिवमने जिंकल्यानंतर टायरनने हार मानली नाही. दुसऱ्या गेममध्ये त्याला तोडीस तोड उत्तर देत टायरनने सामन्यात रंगत अाणली. तिसऱ्या गेममध्ये मात्र शिवमला चांगला खेळ करता अाला नाही. टायरनच्या झंझावातासमोर शिवमची डाळ शिजू शकली नाही.


मुलींमध्ये क्रिषा, नायशाची अागेकूच

क्रिशा शाह अाणि नायशा बाटोये यांनी मुलींच्या १५ वर्षांखालील गटात अापापले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली अाहे. उपउपांत्यपूर्व फेरीत क्रिशाने श्रेया चारी हिला १४-१५, १५-१०, १५-१२ असे पराभूत केले. नायशा हिने अनिष्का दागा हिच्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत १५-१, १५-१ असा विजय मिळवला.


हेही वाचा -

टायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा