Advertisement

टायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक


टायरन परेरा, विक्रांत निनावेची उपांत्यपूर्व फेरीत धडक
SHARES

टायरन परेरा अाणि विक्रांत निनावे या दोन अव्वल मानांकित खेळाडूंनी सीसीअाय-ग्रेटर मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद २०१८ स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. क्रिकेट क्लब अाॅफ इंडिया (सीसीअाय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अव्वल मानांकित टायरननं वेदांत श्रीवास्तव याला १५-१०, १५-१० असं पराभूत केलं. दुसऱ्या मानांकित विक्रांतनं क्रिश ठाकूर याचं अाव्हान १५-१२, १५-१३ असं परतवून लावलं.टायरनसमोर पराभवाचं संकट

दरम्यान, टायरनसमोर पहिल्याच फेरीत पराभवाचं संकट उभं राहिलं होतं. मात्र अायनूर खान याला १३-१५, १५-७, १५-९ अशी पराभवाची धूळ चारत टायरननं विजयी अागेकूच कायम राखली. अटीतटीच्या रंगलेल्या अन्य सामन्यात वेदांत श्रीवास्तवनं ज्युलियन कोर्डाला १५-१३, ७-१५, १५-८ असं हरवलं. दियान जैन यानं झुंजार वृत्तीचं प्रदर्शन करत अादित्य चौधरी याच्यावर १५-६, १४-१५, १५-१३ असा विजय मिळवून दुसऱ्या फेरीत मजल मारली.


मुलींमध्ये तारिणी, नायशाचे विजय

मुलींच्या १३ वर्षांखालील गटातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात, अव्वल मानांकित तारिणी सुरी हिनं अार्या मुजुमदार हिचा १५-१, १५-१ असा सहज पराभव केला. दुसऱ्या मानांकित नायशा बाटोयो हिने अनन्या शाह हिचे अाव्हान १५-२, १५-१ असे सहज परतवून लावले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement