Advertisement

बिलियर्डस लीगच्या फायनलमध्ये सीसीअाय, एमसीएफ भिडणार


बिलियर्डस लीगच्या फायनलमध्ये सीसीअाय, एमसीएफ भिडणार
SHARES

जेतेपदासाठी दावेदार समजला जाणारा सीसीअाय प्रेझमन संघ अाणि एमसीएफ टफ मेन यांनी अापापले उपांत्य फेरीचे सामने जिंकून सीसीअाय केकू निकोल्सन बीएसएएम बिलियर्डस लीग २०१८च्या अंतिम फेरीत मजल मारली अाहे. अाता अंतिम फेरीत या दोन मातब्बर संघांमध्ये जेतेपदासाठीचा थरार रंगणार अाहे.


सीसीअायचा पीसीएलवर विजय

क्रिकेट क्लब अाॅफ इंडियाच्या (सीसीअाय) प्रेझमन) टीमने सांघिक खेळाचे प्रदर्शन करत पहिल्यांदा ६०० गुण पटकावण्याची करामत करत पीसीएल बीच बाॅइज संघावर ६००-४३६ असा विजय मिळवला. हसन बदामीने अमित सप्रूविरुद्ध २०० गुण पटकावले. त्यानंतर स्पर्श फेरवानीने विशाल गेहानीवर मात करत अाणि निशांत डोसाने संजीव बिजलानीवर मात करत २०० गुण पटकावत सीसीअायला विजय मिळवून दिला.


एमसीएफची ईसीसीवर मात

दुसऱ्या उपांत्य सामन्यात, एमसीएफच्या (मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन) टफ मेन संघाने ईसीसीच्या एल्फाइस थंडरबोल्ट्स संघावर ६००-२०९ अशी सहज मात करत अंतिम फेरी गाठली. चंदू खानसोदरियाने रयान राझमीला हरवत २०० गुण मिळवले. त्यानंतर रोहन जाम्बुरसिरा अाणि अक्षय गोगरी यांनी अापापले सामने सहज जिंकत एमसीएफच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा -

सीसीअाय केकू निकोल्सन बिलियर्डस लीग सोमवारपासून रंगणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा