चेन्नई कसोटी सामन्यावर शंका

  Pali Hill
  चेन्नई कसोटी सामन्यावर शंका
  मुंबई  -  

  नरिमन पॉइंट - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे. त्यामुळे चेन्नईमधील आगामी कसोटी समान्यविषयी सध्या कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी दिली. भारत आणि इंग्लडमधील पाचवी आणि शेवटची कसोटी 16 ते 20 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार होती.

  पण जयललिता यांच्या निधनामुळे या सामन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. शिवाय तामिळनाडू क्रिकेट अससोसिएशनशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं मंगळवारी 6 डिसेंबरला नरिमन पॉइंटमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पाच कसोटी सामन्यात भारताला 2-0 अशी आघाडी मिळाली.
  मात्र सोमवारी रात्री जयललिता यांच्या निधनयामुळे तामिळनाडूत 7 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.