Advertisement

‘सुवर्ण’श्रेयसी, नेमबाजीत डबल ट्रॅपमध्ये पटकावले गोल्ड


‘सुवर्ण’श्रेयसी, नेमबाजीत डबल ट्रॅपमध्ये पटकावले गोल्ड
SHARES

भारतीय नेमबाज श्रेयसी सिंग हिनं अाज भारताच्या खात्यात अाणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. अाॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत श्रेयसीनं महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत सुवर्णपदक पटकावलं. याअाधी श्रेयसी हिनं ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होतं.


अंतिम फेरीत ९६ गुण

२६ वर्षीय श्रेयसीने अंतिम फेरीत २४, २५, २२ अाणि २५ गुण पटकावत एकूण ९६ गुणांसह गोल्ड मेडल अापल्या नावावर केलं. तिनं अाॅस्ट्रेलियाच्या इमा काॅक्स हिच्यावर मात केली. स्काॅटलंडच्या लिंडा पिअर्सन हिला ८७ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या वर्षा वर्मन हिला मात्र एका गुणाच्या फरकानं पदकापासून वंचित राहावं लागलं. तिने ८६ गुण मिळवले.


हेही वाचा -

हिना सिधूचा 'सुवर्णवेध, राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा