Advertisement

विजेत्यांचा सन्मान सोहळा


विजेत्यांचा सन्मान सोहळा
SHARES

शिवडी - जिव्हेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवडी पश्चिमेच्या बीडीडी चाळ क्रमांक 15 -16 च्या पटांगणात 11 डिसेंबरला क्रिकेट सामने आयोजित केले गेले. या सामन्यात विजयी ठरलेल्या संघाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
यात विजेता संघ म्हणून जितेन भाई मित्र मंडळ दहिसर यांना 1 लाख रुपयांचा धनादेश आणि चषक देण्यात आलं. तर उपविजेत्या गणेश गल्ली लालबाग संघाला 50 हजार रुपयांचा धनादेश आणि चषक देण्यात आला. तसंच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण इत्यादी बक्षिसं सामाजिक कार्यकर्ते शेखर मोकळे, सत्पाल वाबळे, पप्या महाडिक यांच्या हस्ते वितरित करण्यात आली. या वेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement