देवेंद्र जोशीचे उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित


SHARE

बीपीसीएलचा मुंबईचा अव्वल बिलियर्डसपटू देवेंद्र जोशी अाणि रेल्वेच्या के. वेंकटेश यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आयोजित सीसीआय बिलियर्डस क्लासिक २०१८ स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद करत अापले उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. सर विल्सन जोन्स बिलियर्डस रूममध्ये सुरू असलेल्या लढतीत देवेंद्र जोशीने महाराष्ट्राच्या राज खांडवालावर ४९८-३५७ असा विजय मिळवला.


रोहन जांबुसरियाची अागेकूच

मुंबईच्या रोहन जंबुसरियाने व्ही. सुब्रमणियनवर ३०७-२९३ अशी मात करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्याअाधी त्याने महाराष्ट्राच्या शेखर सुर्वेला २९१-२५९ असे पराभूत केले होते. दरम्यान, माजी जागतिक विजेत्या रुपेश शाहने क गटात सलग विजय नोंदवले. गुजरातच्या या खेळाडूने महाराष्ट्राच्या शेखर सुर्वेला ५६९-१७५ असे पराभूत केले. शाहने आपल्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या व्ही. सुब्रह्मण्यमला ३६४-२०४ असे हरवले होते.


अालोक कुमारची चमक

आशियाई चॅम्पियन आलोक कुमार याने ड गटातील आपले दोन्ही सामने जिंकत चमक दाखवली व उप-उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले. अालोकने महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित ज्युनियर खेळाडू रायन राझमीला ५५७-३५१ असे नमविले. तर पुढच्या लढतीत त्याने रेल्वेच्या नीरज कुमारवर ४३८-३०० असा विजय मिळवला.


हेही वाचा -

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

अांतरराष्ट्रीय खेळाडू संगीता चांदोरकर सुरू करणार कॅरम अकॅडमीसंबंधित विषय
ताज्या बातम्या