Advertisement

अांतरराष्ट्रीय खेळाडू संगीता चांदोरकर सुरू करणार कॅरम अकॅडमी


अांतरराष्ट्रीय खेळाडू संगीता चांदोरकर सुरू करणार कॅरम अकॅडमी
SHARES

मुंबईची अांतरराष्ट्रीय कॅरमपटू संगीता चांदोरकर अाता नव्या भूमिकेत दिसणार अाहे. मुंबईतूनही अनेक दिग्गज कॅरमपटू घडविण्यासाठी संगीता चांदोरकरनं अापली स्वत:ची कॅरम अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. दादर, नायगाव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात या अकॅडमीचा शुभारंभ स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ अाॅगस्टला होणार अाहे. तिच्या या अकॅडमीसाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने जागा उपलब्ध करून दिली अाहे. नायगावमध्येच बालपण गेलेल्या अाणि कॅरममध्ये यशोशिखरावर असलेल्या संगीता चांदोरकरने कॅरम खेळासाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेने ही अकॅडमी सुरू करण्याचे ठरवले अाहे.


युवा कॅरमपटू घडविण्याचा निर्धार

१० ते १८ वयोगटातील मुलांसाठी तसेच स्त्रियांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार अाहे. जे खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवत अाहेत, त्यांनाही अद्ययावत प्रशिक्षण दिलं जाणार अाहे. या अकॅमडमीच्या माध्यमातून भविष्यातील युवा कॅरमपटू घडविण्याचा निर्धार संगीता चांदोरकरने बाळगला अाहे.

संगीता चांदोरकरची अोळख

संगीता चांदोरकरने अापल्या कारकीर्दीत महिला गटात जागतिक विजेतेपदासह राष्ट्रीय विजेतेपद, पाच वेळा राज्य विजेतेपद, तीन वेळा मुंबई जिल्हा अजिंक्यपद, दोन वेळा अमेरिकन अोपन उपविजेतेपद अशी कामगिरी केली अाहे. मुंबई अाणि महाराष्ट्रात तब्बल ३५० पेक्षा जास्त राज्यस्तरीय अाणि विविध स्पर्धांची जेतेपदे पटकावण्याचा मान संगीता चांदोरकरने पटकावला अाहे. तिला महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊनही गौरवण्यात अालं अाहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा