Advertisement

टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात


टाटा मुंबई मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात
SHARES

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवणारी अाणि मुंबईकरांच्या फिटनेसचा मंत्र देऊन त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेल्या टाटा मुंबई मॅरेथाॅन शर्यतीच्या नोंदणीला सुरुवात झाली अाहे. मुंबई मॅरेथाॅनचे १६वे पर्व रविवार, २० जानेवारी २०१९ रोजी रंगणार असून वेगवेगळ्या सहा गटात जवळपास ४६ हजार धावपटूंना सहभागी होण्याची संधी मिळणार अाहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत राजभवन येथे पूर्ण मॅरेथाॅनच्या नोंदणीला सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत धावपटूंना सहभागी होता येईल.


हाफ मॅरेथाॅनची नोंदणी २ अाॅगस्टपासून

लोकप्रिय ठरलेल्या हाफ मॅरेथाॅन गटाच्या नोंदणीला २ अाॅगस्ट रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होणार असून १७ अाॅगस्ट २०१८ पर्यंत नोंदणी करता येईल. हौशी धावपटूंच्या १० किमी गटाची नोंदणी २० अाॅगस्टपासून सुरू होणार असून ती ८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.


महिला धावपटूंना प्रोत्साहन

मुंबई मॅरेथाॅनच्या माध्यमातून देशाला अनेक चांगल्या महिला अॅथलिट मिळाल्या अाहेत. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी टाटा मुंबई मॅरेथाॅनद्वारे महिलांना प्रोत्साहन देण्यात येत अाहे. खुल्या १० किमी शर्यतीत ज्या महिलांकडे टायमिंग सर्टिफिकेट नाही, अशा धावपटूंसाठी काही जागा राखीव ठेवण्यात अाल्या अाहेत. अर्धमॅरेथाॅनसाठी महिलांकरिता टायमिंग सर्टिफिकेट अावश्यक करण्यात अाले असून त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येईल.


येथे करा नोंदणी

ऑनलाईन नोंदणीसाठी https://tatamumbaimarathon.procamrunning.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुंबईतील रहिवाशांसाठी नोंदणी अर्ज काही निवडक एसिक्स स्टोअर्स अाणि सिलेक्शन सेंटर स्पोर्टस स्टोअर्समध्ये त्याचबरोबर एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, युनायटेड वे मुंबई कार्यालय येथे उपलब्ध अाहेत.


हेही वाचा -

अवघी मुंबई झाली मॅरेथॉनमय…

हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी झेंडा, महिलांमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधव, मोनिका आथरेची बाजी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा