आधार- नोंदणी केंद्रावर छापा

 Mumbai
आधार- नोंदणी केंद्रावर छापा

धारावी - बनावट शासकीय पुरावे तयार करून आधार कार्ड बनवणाऱ्या धारावीतील काळाकिल्ला परिसरातल्या आधार नोंदणी केंद्रावर पोलिसांनी मंगळवारी छापा टाकलाय. यामध्ये पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह साहित्यासह ऑपरेटरचं काम करणाऱ्या अमोल निकम याला अटक केलीय. याप्रकरणात आणखी तीन आरोपी असून ते फरार आहेत. तर आरोपीविरोधात आधार कार्ड कायदा - २०१६ अंतर्गत कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं

Loading Comments