Advertisement

लोकल अपघातात बोटे गमावलेली द्रविता धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये

मागील वर्षी ७ फेब्रुवारी, २०१७ रोजी कल्याणला राहणारी द्रविता सीएसएमटीच्या दिशेनं प्रवास करत होती. त्यावेळी प्रवासादरम्यान फटका टोळीनं तिचा मोबाइल मारला होता. त्यामुळे द्रविताचा लोकलमधून हात निसटल्यामुळे रुळावर पडली. त्यावेळी द्रविताचा एक हात आणि पायावरून लोकल गेली.

लोकल अपघातात बोटे गमावलेली द्रविता धावणार मुंबई मॅरेथॉनमध्ये
SHARES

लोकल अपघातात उजव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताची बोटे गमावलेली द्रविता सिंग यंदाच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहे. लोकल अपघातानंतर तब्बल दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर द्रविता मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहे. द्रवितावर उपचार करणारे डॉ. शैलेश रानडे यांनी त्यांच्यासह तिलाही सहभागी केलं आहे. उपचारावेळी डॉक्टरांनी द्रविताला बरी करून मॅरेथॉनमध्ये सहभागी करण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यानुसार, येत्या २० जानेवारीला द्रविता डॉक्टरांसहीत मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहे.  


फटका टोळीचा फटका

मागील वर्षी ७ फेब्रुवारी, २०१७ रोजी कल्याणला राहणारी द्रविता सीएसएमटीच्या दिशेनं प्रवास करत होती. त्यावेळी प्रवासादरम्यान फटका टोळीनं तिचा मोबाइल मारला होता. त्यामुळे द्रविताचा लोकलमधून हात निसटल्यामुळे रुळावर पडली. त्यावेळी द्रविताचा एक हात आणि पायावरून लोकल गेली. त्यामुळं तिला उजव्या पायाचा अंगठा आणि डाव्या हाताची बोटे गमावावी लागली.  यावेळी द्रवितावर सहा जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. 


व्यायाम,  योगा

तब्बल दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर द्रविताच्या तब्येतीत सुधारणा झाली असून ती मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे. द्रविताला चालण्या-धावण्यासाठी विशेष चपला-बूट वापरावे लागतात. तसंच, तिनं लोकल प्रवासालाही सुरूवात केली आहे.  द्रविता मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी दोन महिन्यांपासून काही तास धावत असून व्यायाम अाणि योगाही करत आहे. 



हेही वाचा - 

म्हणून रोहित शर्मा सिडनी कसोटीला मुकणार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा