Advertisement

म्हणून रोहित शर्मा सिडनी कसोटीला मुकणार

रोहित पत्नी रितीका आणि कन्येसाेबतच नवीन वर्ष साजरं करणार असल्याने सिडनी कसोटीत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटद्वारे दिली.

म्हणून रोहित शर्मा सिडनी कसोटीला मुकणार
SHARES

भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला रविवारी कन्यारत्नाचा लाभ झाला. ही आनंदवार्ता कळताच रोहित ३० डिसेंबरला आॅस्ट्रेलियातून मुंबईकडे रवाना झाला. रोहित पत्नी रितीका आणि कन्येसाेबतच नवीन वर्ष साजरं करणार असल्याने सिडनी कसोटीत खेळू शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटद्वारे दिली.

भारताची आघाडी

रोहितने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये ६३ धावा करत विजयात खारीचा वाटा उचलला होता. मेलबर्न कसोटी जिंकून भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. तसंच शेवटची कसोटी जिंकण्याचा निर्धारही कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. ३ जानेवारीपासून सिडनी कसोटीला सुरूवात होत आहे.


हार्दिकला संधी?

रोहित शर्माच्या जागी आॅलराऊंडर हार्दिक पंड्याला अकरा जणांच्या संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शेवटच्या कसोटीत अनुपस्थितीत राहणार असला, तरी एकदिवसीय मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियात पुन्हा परतणार आहे.हेही वाचा-

कसोटी पदार्पणातचं मयंक अग्रवालचे दोन नवे विक्रमRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा