मुलुंड नंदनवन इंडस्ट्रीतल्या आगीवर नियंत्रण


SHARE

मुलुंड - मुलुंड पश्चिमेकडील टेलिफोन एक्सचेंज ऑफिसजवळील नंदनवन इंडस्ट्रीयल प्रिमायसेसमधील एका कुरीयर कंपनीच्या गोदामाला आग लागली. मंगळवारी संध्याकाळी साडे सहा-सातच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. दिवाळी निमित्त सुट्टी असल्यानं कुरीयर कंपनीत कुणीही नव्हते. मात्र यामध्ये पाच-सहा संगणक आणि दोन एसी एवढं नुकसान झालंय. हे गोदाम भाडे तत्वावर घेण्यात आलं होतं. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या