Advertisement

हिना सिधूचा 'सुवर्णवेध, राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक


हिना सिधूचा 'सुवर्णवेध, राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक
SHARES

गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज हिना सिधूनं सुवर्णवेध घेत सहाव्या दिवशी भारताच्या खात्यात अाणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. हिना सिधूला सोमवारी रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण त्याची कसर महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भरून काढत हिनानं सोनेरी कळस चढवला. यावर्षीच्या राष्ट्रकुलमधील तिचं हे दुसरं पदक ठरलं अाहे.


भारताचं ११वं सुवर्ण

भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत सहाव्या दिवशी अातापर्यंत २० पदकांची लयलूट केली अाहे. त्यात ११ सुवर्ण, ४ रौप्य अाणि ५ कांस्यपदकांचा समावेश अाहे. सुवर्णपदकांमध्ये नेमबाजांनी तीन, टेबल टेनिसमध्ये दोन सांघिक बॅडमिंटनमध्ये एक सांघिक तर वेटलिफ्टिंगमध्ये पाच सुवर्णपदकांचा समावेश अाहे.


हिना सिधूचा विक्रम

हिना सिधूने २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत ३८ गुणांची नोंद करत राष्ट्रकुलमधील नव्या विक्रमाची नोंद केली. अाॅस्ट्रेलियाच्या एलेना गलियाबोविच हिला ३५ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मलेशियाच्या अलिया सझाना अझाहारी हिनं २६ गुणांसह कांस्यपदक पटकावलं.


हेही वाचा -

एेतिहासिक! भारताला राष्ट्रकुलमध्ये बॅडमिंटनचं पहिलं सुवर्णपदक

टेबल टेनिसमध्ये १२ वर्षांनंतर भारताचा 'सुवर्ण'पंच

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा