Advertisement

राष्ट्रकुलमध्ये भारताची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच


राष्ट्रकुलमध्ये भारताची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच
SHARES

अाॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सची पदकांची लयलूट सुरूच अाहे. चौथ्या दिवशी भारताच्या दोन खेळाडूंनी रविवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावलं तर भारताच्याच हिना सिधू हिनं रौप्यपदक पटकावत दमदार कमबॅक केलं.



मनू भाकरची विक्रमी कामगिरी

हरयाणातल्या जाज्जर तालुक्यातल्या १६ वर्षीय मनू भाकर हिनं विक्रमी कामगिरी करत राष्ट्रकुलमधील पहिल्यावहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिनं २४०.९ गुणांची कमाई करत अव्वल स्थान प्राप्त केलं. हिना सिधू हिनं २३४ गुणांसह रौप्यपदक पटकावलं. अाॅस्ट्रेलियाच्या एलेना गलियाबोविच हिला २१४.९ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावं लागले. मनू भाकर हिनं याअाधी मेक्सिकोतील २०१८ अायएसएसएफ जागतिक चषक स्पर्धेत तसंच सिडनीतील ज्युनियर वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं.



पूनम यादवचं वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

भारताच्या पूनम यादवनं वेटलिफ्टिंग प्रकारात महिलांच्या ६९ किलो वजनी गटात इंग्लंडच्या सारा डेव्हिस हिला मागे टाकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. पूनम हिनं स्नॅच प्रकारात १०० तर क्लिन अाणि जर्क प्रकारात १२२ किलो वजन उचलत एकूण २२२ किलोसह सुवर्णपदक प्राप्त केलं. तिच्या या कामगिरीमुळे भारताच्या नावावर वेटलिफ्टिंगमधलं पाचवं सुवर्णपदक जमा झालं. डेव्हिस हिला शेवटच्या प्रयत्नांत वजन उचलता न अाल्यामुळे २१७ किलो वजनासह रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये मीराबाई चानू ठरली 'गोल्डनगर्ल'

राष्ट्रकुलमध्ये संजिता चानूनं पटकावलं भारतासाठी दुसरं सुवर्णपदक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा