Advertisement

राष्ट्रकुलमध्ये संजिता चानूनं पटकावलं भारतासाठी दुसरं सुवर्णपदक


राष्ट्रकुलमध्ये संजिता चानूनं पटकावलं भारतासाठी दुसरं सुवर्णपदक
SHARES

वेटलिफ्टर खुमुकचम संजिता चानू हिनं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये ५३ किलो वजनी गटात संजिता चानू हिनं निर्विवाद वर्चस्व गाजवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सलग दोन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारी संजिता चानू ही भारताची दुसरी महिला वेटलिफ्टर ठरली अाहे.


नव्या विक्रमाची नोंद

अाॅस्ट्रेलियातील करारा स्पोर्टस अाणि लेजर सेंटर इथं सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग प्रकारात मणिपूरच्या संजिता चानूनं स्नॅच विभागात ८४ किलो वजन उचललं. राष्ट्रकुल स्पर्धेतील हा नवा विक्रम ठरला. क्लिन अाणि जर्क प्रकारात तिने १०८ किलो वजन उचलून एकूण १९२ किलो इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. पापुअा न्यू गिनिअाची गतविजेती लोअा दिका टोउअा हिला १८२ किलोसह रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. कॅनडाच्या रचेल लेब्लांक-बझिनेट हिने १८१ किलोसह कांस्यपदक पटकावलं.


कुंजूराणी देवीकजून घेतली प्रेरणा

महान वेटलिफ्टर कुंजूराणी देवी हिच्याकडून प्रेरणा घेत मणिपूरच्या संजितानं वेटलिफ्टिंगमध्ये अापलं नशीब अजमावलं. २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत २० वर्षांच्या संजितानं सुवर्णपदक पटकावलं होतं. तसंच २०१८ मध्ये राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत १९५ किलो वजन उचलून तिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्याकडून देशाला भरपूर अपेक्षा होत्या.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये मीराबाई चानू ठरली 'गोल्डनगर्ल'

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा