Advertisement

टेबल टेनिसमध्ये १२ वर्षांनंतर भारताचा 'सुवर्ण'पंच


टेबल टेनिसमध्ये १२ वर्षांनंतर भारताचा 'सुवर्ण'पंच
SHARES

भारताच्या पुरुष संघाने नायजेरियाविरुद्धच्या अंतिम सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवत टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिलांनी रविवारी सुवर्णपदक पटकावल्यानंतर पुरुष संघानेही नायजेरियाचा ३-० असा पराभव करत सुवर्णपदक प्राप्त केलं. तब्बल १२ वर्षानंतर भारतानं पुरुषांच्या टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची करामत केली.


भारताचं निर्विवाद वर्चस्व

शरथ अचंता याने एकेरीच्या पहिल्या सामन्यात नायजेरियाच्या बोडे अबियोदून याचा ४०११, ११-५, ११-४, ११-९ असा धुव्वा उडवला. एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात साथियन ज्ञानशेखरन याने सेगून टोरियोला याला १०-१२, ११-३, ११-३, ११-४ असे हरवत भारताला २-० अशी अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर साथियन-हरमीत देसाई यांनी दुहेरीच्या लढतीत अोलाजिदे अोमोटायो-बोडे यांचा ११-८, ११-५, ११-३ असा पाडाव करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.


महिलांचीही सुवर्ण कामगिरी

भारताच्या महिला टेबल टेनिस संघानेही रविवारी सिंगापूरवर ३-१ अशी मात करत सुवर्णपदक पटकावण्याची करामत केली होती. मानिका बात्राने एकेरीचा सामना जिंकत भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर ठाण्याच्या मधुरिका पाटकरला एकेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मात्र मधुरिका पाटकर-मौमा दास यांनी दुहेरीच्या लढतीत विजय मिळवला. त्यानंतर मानिका बात्राने एकेरीची लढत जिंकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये ठाण्याच्या मधुरिका पाटकरला टेबल टेनिसमध्ये सांघिक सुवर्णपदक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा