SHARE

भारताच्या महिला टेबल टेनिस संघाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नव्या अध्यायाची नोंद केली. ठाण्याच्या मधुरिका पाटकरचा समावेश असलेल्या भारतीय संघाने सिंगापूरवर ३-१ अशी मात करत राष्ट्रकुल स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. भारताचं हे या स्पर्धेतलं सातवं सुवर्णपदक ठरलं.


मोनिका बात्राचा संघर्षमय विजय

पहिल्या सामन्यात भारताच्या मोनिका बात्राला सिंगापूरच्या तियानवेई फेंग हिच्यावर विजय मिळविण्याकरिता संघर्ष करावा लागला. पाच गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मोनिकाने ११-८, ८-११, ७-११, ११-९, ११-७ असा विजय मिळवत भारताला १-० अशी अाघाडी मिळवून दिली.


मधुरिकाचे संमिश्र यश

दुसऱ्या सामन्यात मात्र भारताच्या मधुरिका पाटकरला पराभवाचा सामना करावा लागला. सिंगापूरच्या मेंगयू यू हिने मधुरिकाला १३-११, ११-२, ११-६ असे सरळ गेममध्ये हरवले. दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात मौमा दास अाणि मधुरिका यांनी पराभवाचा वचपा काढत यिहान झोऊ अाणि मेंगयू यांच्यावर ११-७, ११-६, ८-११, ११-७ अशी मात केली.


मानिकाचा दुसरा विजय

चौथ्या गेममध्ये मानिका बात्राने पुन्हा एकदा दमदार सुरुवात भारताला सुवर्णपदकाच्या अाशा दाखवून दिल्या. अापल्या कामगिरीत सातत्य राखत मानिकाने यिहान झोऊ हिच्यावर ११-७, ११-४, ११-७ अशी मात करत भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.


हेही वाचा -

राष्ट्रकुलमध्ये भारताची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच

राष्ट्रकुलमध्ये मीराबाई चानू ठरली 'गोल्डनगर्ल'

संबंधित विषय
ताज्या बातम्या