Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानची बोरीवली वायएमसीएवर मात


घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानची बोरीवली वायएमसीएवर मात
SHARES

घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानच्या मुलांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करत मस्तान वायएमसीए बास्केटबाॅल स्पर्धेत बोरीवली वायएमसीए संघावर ४५-३१ असा विजय मिळवला. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात, घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठानने पहिल्या सत्रापासूनच अाघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवला. कर्णधार कौशल सिंग, तुषार गुप्ता अाणि रामबाली गुप्ता यांनी अप्रतिम कामगिरी करत गुण वसूल केले. बोरीवली वायएमसीएने सुरेख खेळ केला, पण शेवटच्या क्षणी चेंडूला जाळ्यात धाडताना अनेक चुका केल्यामुळे त्यांना हा सामना गमवावा लागला.


घाटकोपर वायएमसीएचा विजय

अाग्रीपाडा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत, घाटकोपर वायएमसीए संघाने अमन शर्मा अाणि अात्माराम यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे १६ वर्षांखालील मुलांच्या गटात खारघरच्या रायन इंटरनॅशनलचा ४५-४ असा धुव्वा उडवला. याच गटात, पवईच्या हिरानंदानी फाऊंडेशनने ख्राईस्ट अ संघाचा ४१-३१ असा पाडाव केला. १३ वर्षांखालील मुलांच्या गटात, एनबीए संघाने सेंट जोसेफ संघावर ३१-२८ असा निसटता विजय मिळवला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा