Advertisement

गिरीश पिंपळेच्या चार गोलमुळे अवे मारिया अंतिम फेरीत


गिरीश पिंपळेच्या चार गोलमुळे अवे मारिया अंतिम फेरीत
SHARES

गिरीश पिंपळेने मिळालेल्या संधींवर चार गोल झळकावत दादरच्या अवे मारिया संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात सायसा क्लबवर १०-४ असा विजय मिळवून दिली. कार्मेल स्पोर्टस कमिटीतर्फे माउंट कार्मेल चर्चच्या मैदानात सुरू असलेल्या माउंट कार्मेल निमंत्रितांच्या रिंक हाॅकी स्पर्धेत गिरीश पिंपळेचा बोलबाला पाहायला मिळाला.


विनय वाल्मिकीची सुरेख साथ

अवे मारियाच्या गिरीश पिंपळेला विनय वाल्मिकी अाणि सालोमन अलेक्झांडर यांचीही चांगली साथ लाभली. दोघांनी प्रत्येकी दोन गोल करत अवे मारियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विक्रम सिंग अाणि नितीन कुमार यांनी एक गोल करत विजयात योगदान दिले. सायसाकडून सौरभ भायंदरकरने दोन तर अाॅरिस्टन डिसूझा अाणि स्मित देवकर यांनी प्रत्येकी एक गोल केला.


सी व्ह्यू एससी सुस्साट

अंतिम फेरीत अवे मारियाची गाठ सी व्ह्यू एससी संघाशी पडणार अाहे. सी व्ह्यूने रिबेल्स एससी संघावर ४-२ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. करण कपूरचे दोन गोल अाणि ज्युलियस फर्नांडेस व गेव्हिन वँड्रिन यांचे प्रत्येकी एक गोल सी व्ह्यूच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले.


हेही वाचा -

अायपीएलच्या फायनलची काॅमेंट्री अाता मराठीतही!

कसोटीतून 'टाॅस' होणार हद्दपार?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा