Advertisement

अल्झायमरच्या रुग्णांंसाठी आरोग्यमंत्री धावले


अल्झायमरच्या रुग्णांंसाठी आरोग्यमंत्री धावले
SHARES

जागतिक अल्झायमर दिनाच्यानिमित्ताने रविवारी वरळी सिफेस येथे अवरेथॉन २०१७ चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आरोग्य मंत्री दिपक सावंत देखील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या अवरथॉनचं उद्घाटन करण्यात आलं. अल्झायमर या आजारामुळे स्मृतिभ्रंश होतो. अशावेळी या रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. ते देखील समाजातीलच एक घटक आहेत. त्यांना विसरून चालणार नाही, असे दिपक सावंत यावेळी म्हणाले.'यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेईल'

आपला अनुभव कथन करताना आरोग्यमंत्री म्हणाले, 'माझ्या आईला देखील स्मृतिभ्रंशाचा आजार जडला होता. मी 11 वर्ष तिची सेवा केली. या आजारामुळे रुग्णांना होणार त्रास आणि नातेवाईकांना घ्यावी लागणारी काळजी मी अनुभवली आहे. यामुळेलच अल्झायमरच्या जानजागृती मोहिमेशी मी जोडलो गेलो.
या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असून त्यासाठी आरोग्य विभाग पुढाकार घेईल
', अशी ग्वाहीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. 'रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन आणि प्रशिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था जर पुढे आल्या तर त्यांना राज्यातील जी चार मनोरुग्णालयं आहेत तेथे आरोग्य विभागामार्फत जागा उपलब्ध करून देण्यात येईल. एक चळवळ म्हणून या आजाराच्या जानजागृतीसाठी प्रयत्न केले जातील', असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

अल्झायमर आजाराच्यानिमित्ताने रविरवारी ३ किमीची दौड आयोजित करण्यात आली. यामध्ये दिपक सावंत यांनी देखील सहभागी होऊन उत्साह निर्माण केला. यावेळी अभिनेत्री तितिक्षा तावडे तसेच संघटनेच्या सरचिटणीस विद्या शेनॉय देखील उपस्थित होत्या.

संबंधित विषय
Advertisement