वडाळ्यात हिंद करंडक स्पर्धा

 Pali Hill
वडाळ्यात हिंद करंडक स्पर्धा

वडाळा - शारीरिक शिक्षण मंडळ आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमी यांच्या वतीने 74 व्या आंतरशालेय हिंद करंडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरात होणाऱ्या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, लंगडी या खेळांचा समावेश असणार आहे.

यंदा प्रथमच हिंद करंडकमधील कबड्डी स्पर्धा प्रो कबड्डीसारख्या नवीन प्रचलित नियमानुसार आणि पॉवर प्लेच्या नव्या स्वरुपात होणार आहेत. यामध्ये एकूण 55 शाळांनी सहभाग नोंदवला आहे. यापूर्वी झालेल्या हिंद करंडक कबड्डीच्या कार्यशाळेला शालेय विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

शालेय मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी कबड्डीत पॉवरप्लेची संकल्पना राबवण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. त्यानुसार अंतिम फेरीच्या सामन्यात सहाव्या आणि एकविसाव्या मिनिटापासून दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी पाच मिनिटे पॉवरप्लेचा प्रयोग केला जाणार आहे. त्यामध्ये क्षेत्ररक्षणात किमान तीन बचावपटू असताना गुण घेणाऱ्या चढाईपटूस अथवा एकटा असतानादेखील पकड करणाऱ्या बचावपटूस झटापटीमधील यशस्वीतेसाठी प्रत्येकी रोख रुपये शंभर प्रमाणे पुरस्कार दिला जाणार आहे. सदर स्पर्धेचं उद्घाटन मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय शेटे, आयडियल स्पोर्ट्स अकॅडेमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, मुंबईचा नामवंत प्रो कबड्डीपटू रिशांत देवाडिगा यांच्या हस्ते करण्यात आलं.

स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा

 1. महात्मा गांधी विद्यामंदिर
 2. शारदाश्रम विद्यामंदिर
 3. साने गुरुजी हायस्कूल
 4. नाईक विद्यालय - कोपरखैरणे
 5. डॉ. शिरोडकर हायस्कूल
 6. उत्कर्ष विद्यामंदिर
 7. जनता हायस्कूल
 8. अरुणोदय स्कूल - ठाणे
 9. सोशल सर्व्हिस लीग
 10. डॉ. अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूल
 11. शिशू विकास मंदिर - ठाणे
 12. शिरवणे विद्यालय - नेरूळ

एकूण शाळेतील मुलामुलींचे 55 कबड्डी संघ सहभागी झालेत. लंगडी स्पर्धेत 36 शालेय संघांनी तर खोखो स्पर्धेत 33 शालेय संघांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धा 10 ते 13 जानेवारी दरम्यान दररोज सकाळी 9 ते सायं. 4.30 वाजेपर्यंत होणार आहेत.

Loading Comments