Advertisement

झाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित


झाकीर नाईक प्रकरणी चार अधिकारी निलंबित
SHARES

वादग्रस्त झाकीर नाईकच्या एनजीओच्या एफसीआरए परवान्याचं नुतनीकरण केल्याप्रकरणी केंद्रीय गृहखात्याच्या चार अधिका-यांचं निलंबन करण्यात आलंय. सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या या एनजीओच्या परवान्याचं नुतनीकरण झाल्यानं सरकारी खात्यांचा अनागोंदी कारभार समोर आलाय. 
१९ ऑगस्टला इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या एफसीआरए परवान्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. तरुणांना फूस लावून दहशतवादाकडं वळवण्याचा आरोप असलेला झाकीर आणि त्याची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असताना अधिकाऱ्यांच्या या निष्काळजीपणानं सरकारवर तोंडघशी पडण्याची वेळ आलीय. ढाक्यातील होली अर्टिशियन कॅफेमध्ये झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोर झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचं समोर आलं होतं.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा